सेंट्रल ग्राउंड वॉटर ओथोरिटीने घातलेल्या अटीची अंमलबजावणी मुंबई मध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबई वर पाणी-बाणी येण्याची शक्यता आहे. कारण आज मध्यरात्री पासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी १५०० टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्या मुंबईत पाळणे अशक्य आहे. त्यामध्ये सूट मिळायला हवी, नाईलाजाने हा पाणीपुरवठा बंद करावा लागत आहे. यामुळे मोठा परिणाम मुंबई वर होईल अशी प्रतिक्रिया या टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.