अमरावतीतील देविदास इंगोले आणि राणी राठोड नामक या दोन व्यक्तींचा सिग्नलवरील नाचतानाचा एक रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणी अनेकांनी भर रस्त्यात असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत अखेर पोलिसांनी देविदास इंगोले यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता राणी राठोड यांनी या प्रकाराविषयी माफी मागितली आहे.