Ajit Pawar And Supriya Sule: भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.तो रस्ता क्राँक्रीटचा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळेंनी काल (९ एप्रिल) पुण्यात आंदोलन केले. या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “खासदारांना देखील पाच कोटींचा निधी असतो, खासदाराला एखादं काम करायचं असेल तर ते खासदार निधी देऊन ते काम करुन घेऊ शकतात”, असं अजित पवार म्हणाले. आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.