मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलं आहे. राणाला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या मोहम्मद तौफिक उर्फ छोटू चहावाल्याने देखील हीच मागणी केली आहे. राणाला कसाबप्रमाणे बिर्याणी खाऊ घाल्याची गरज नाही. दहशतवाद्यांसाठी कायदा करायला हवा, ज्यामध्ये त्यांना दोन ते तीन महिन्यात फाशी किंवा रस्त्यात गोळ्या घातल्या पाहिजे, असं तो म्हणाला.