उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा गुरवारी बारामती येथे संपन्न झाला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचं स्वागतही अजित पवार यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.