अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याच्या ‘सुशीला-सुजीत’ सिनेमात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. यानिमित्ताने या दोघांनी लेखक अजय कांबळेसह लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती. मराठी इंडस्ट्री, सध्याचं स्टारडम, सिनेविश्वात होणारे नवनवीन प्रयोग, निर्मितीक्षेत्र याबद्दल या कलाकारांनी मनसोक्त गप्पा मारल्या.