Income Tax Notice: आपल्याला कुठे इनकम टॅक्सवाले नोटीस पाठवणार, आपली कशाला कोण चौकशी करतंय? असा जर विचार तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतही कुणी करत असेल तर आजचा हा व्हिडीओ अजिबात स्किप करू नका. अगदी जनसामान्यांपासून ते धनाढ्यांपर्यंत सर्वांच्या आर्थिक व्यवहारांवर आयकर विभाग आता डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारख्या आधुनिक साधनांचा वापर करून बारकाईने लक्ष ठेवून आहे. अगदी तुम्ही करत असलेले UPI, कार्ड पेमेंट्स एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओतही आपण अशा ५ रोख व्यवहारांविषयी जाणून घेणार आहोत जे तुम्हालाही आयकर विभागाच्या रडारवर आणू शकतात.