Sambhaji Bhide Guruji Bitten By Stray Dog: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सांगली महानगरपालिका कडून शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. माळी गल्ली परिसरामध्ये संभाजी भिडेंना कुत्र्यांना चावलं, त्याच ठिकाणी गेल्या सहा महिन्यांमध्ये चार जणांना त्याच कुत्र्याने चावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांकडून देखील भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.