मुलुंड मधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये एका विकृत शिक्षकाने शाळेतील शिक्षिक यांना रात्री १२च्या नंतर फोन करून शिवीगाळ करत अश्लील शब्द वापरले. तसंच शाळेतील विद्यार्थिनींची छेड काढण्याचाही प्रकार केला असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आज मनसैनिकांनी या शाळेत जाऊन या मॅनेजमेंटला धारेवर धरत शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला व तोंडावर कोळसा फेकून मारला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेतलं असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.