दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी अट टाकली असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. एकही अट आणि शर्त त्यामध्ये नाही, असं संजय राऊत म्हणालेत. तर महाराष्ट्र हिताच्या फाॅर्म्युल्यात भाजपा बसत नाही, असंही ते म्हणाले.