महायुती सरकारनं नगराध्यक्षांना हटविण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा नवीन अध्यादेश काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी आज प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतमध्ये पाहायला मिळाली. कर्जत नगरपंचायतमध्ये आज दिवसभर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांविरोधात दाखल अविश्वास ठरावावर विशेष सभा घेण्यात येणार होती. मात्र तत्पूर्वी नगराध्यक्षांनीच राजीनामा दिला आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये नेमकं काय घडलं पाहूया