Santosh Deshmukh House Massajog, Beed : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हत्येवरुन आरोपांच्या फैरी झडल्या. तसंच या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचंही समोर आलं. धनंजय मुंडे यांना याच प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला कारण वाल्मिक कराड हा त्यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या घराजवळ एका अज्ञात महिलेचा वावर दिसून आला.