Rupali Patil: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील या कुटुंबियांसोबत पहलगाम येथे फिरण्यास गेल्या होत्या. आता काश्मीरमधून रूपाली पाटील यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.केंद्र आणि राज्य सरकारने आम्हाला लवकरात लवकर सर्वांना येथून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी व्हिडिओद्वारे केली आहे.