माझ्या डोळ्यादेखत माझ्या पतीला गोळ्या झाडल्या. मला अजूनही विश्वास बसत नाही की, माझे पती हयात नाहीत. ही
आपबिती सांगितली आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या पल्लवी यांनी.जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास २६ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील एक कुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते. यावेळी मंजूनाथ यांच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केला. तर त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांचा मुलगा हल्ल्यातून बचावले आहेत. यावेळी पल्लवी यांनी या हल्ल्याची दाहकता कथन केली आहे.