पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील दोन नागरिकांचादेखील समावेश आहे. मृतांचं पार्थिव आज सायकांळी पुण्यात आणलं जाईल. तसंच पहलगाममध्ये अडकलेल्या पुणेकरांनाही परत आणण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले.