Pahalgam Terror Attack Militants Photo & Sketch released : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो समोर आला आहे. हा त्याचा पाठमोरा फोटो असून त्याच्या हातात एके-४७ ही मशीन गन आहे.