Pahalgam Terror Attack Updates: जम्मू-काश्मीरच्या अतिशय शांत आणि रम्य अशा पहलगाममध्ये मंगळवारी भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून वेचून मारले. अनेक राज्यातील २६ लोकांचा या हल्ल्यात जीव गेला. यामध्ये स्थानिक नागरिक सय्यद आदिल हुसैन शाह याचाही समावेश होता. पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरन पर्वत रांगामधील पॉईंट दाखविण्याचे काम तो करत होता. जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा पर्यटकांना वाचविण्यासाठी तो थेट दहशतवाद्यांशी भिडला, मात्र यात त्याला जीव गमवावा लागला.