Jammu Kashmir Attack Pune Protest: जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोळीबार केला.या घटनेमध्ये जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.तर त्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांचा समावेश आहे.या घटनेमुळे देशभरातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत आहे.त्याच दरम्यान भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकीज चौकात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध नोंदविण्यात आला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेले कौस्तुभ गणबोटे यांची बहिण अर्चना देवधर या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.