Pahalgam J&K Attack: काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे ? आणि मुस्लिम कोण आहे ? सर्वात आधी संजय लेले यांनी हात वर केले. त्यांना लगेचच अतिरिक्यांनी गोळी मारली. त्यानंतर आमच्या समोरच लोकांवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांविरोधात सरकारने ठोस कारवाई केली पाहिजे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.