पहलगाममधील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने त्यांच्या राज्यात आणि शहरात आणलं जात आहे. अडकलेल्या या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिकांचाही समावेश आहे. यावेळी महाराष्ट्रात परतत असलेल्या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ काॅलद्वारे संवाद साधला. तुम्हाला आणायला थोडा उशीर झाला. पण आता सुरक्षित घरी या असं अजित पवार म्हणाले.