“आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून त्याला मारलं नाही. काल कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, त्यांनी धर्म विचारून मारलं. हिंदू असं कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. त्यामुळे देश बलवान पाहिजे”, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या स्मृतिदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.