पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतात संतापची लाट उसळली आहे. पाकिस्तानला धडा शिकवाव, अशी भावना व्यक्त केली जात आहेत. अशातच मंत्री नितेश राणे यांनी धर्म विचारून दुकानातून सामान विकत घ्या असं विधान केलं आहे. त्यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्ल्यानंतर काश्मीरी लोकांनीच पर्यटकांना मदत केली असा उल्लेख केला. त्यामुळे धर्म द्वेष थांबवा, नाहीतर भारताचा पाकिस्तान कराल असं बोलण्याची वेळ आली आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले .