महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाही, असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं. त्यांच्या या विधानावर चौफेर टीका केली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय गायकवाडांना समज देण्यास सांगितली. त्यांनतर आता संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.