जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे २२एप्रिल ला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २८ एप्रिलला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याच दरम्यान पुण्यात राहणार्या काश्मिरी तरुणांना सोशल मीडियावर धमक्या दिल्याची घटना घडली समोर आली आहे.त्याबाबत काही तरुणांनी एकत्रित येत पुण्यात पत्रकार परिषद घेतली.