Avinash Jadhav Meets Palghar Speaking Crow: पालघरचा बोलणारा कावळा ‘काळू’ हा मागील काही आठवड्यांपासून सतत चर्चेत आहे. याच निमित्ताने मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पालघरला भेट दिली असता या काळू कावळ्याची आवर्जून भेट घेतली आहे. कावळ्याशी जाधव यांनी मराठीत गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी कावळ्याला मराठी शिकवणाऱ्या चिमुकलीचे सुद्धा भेट घेतली व तिचे कौतुक केले. एक मुका प्राणी सुद्धा मराठी बोलायला लागला पण परप्रांतीयांना मराठी येत नाही असं म्हणत अविनाश जाधव यांनी यावेळी मराठी विरुद्ध हिंदी वादावर सुद्धा भाष्य केलं आहे. पालघरच्या भेटीत अविनाश जाधव यांच्याशी कावळा काय काय बोलला हे आपण पाहूया.