Pahalgam Terror Attack: पहलगाममधील बैसरन येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जण ठार झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यातून बचावलेल्या एका महिलेने प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं की, एकूण चार दहशतवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला होता.त्यांनी पर्यटकांना आधी त्यांचा धर्म विचारला त्यानंतर गोळीबार केला. तुम्ही हिंदू आहात का? असं विचारून जे हिंदू होते त्यांच्यावरच गोळ्या झाडल्याचं या महिलेने सांगितलं. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.