Jalgaon Father Kills Daughter Over Wedding: चोपडा शहरातील आंबेडकर नगरात हळदीचा कार्यक्रम सुरु असताना सी.आर.पी.एफ मधून सेवा निवृत्त झालेल्या पी.एस.आय.च्या मुलीचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. किरण मंगळे याने आपल्याजवळ असलेल्या परवानाधारक पिस्तूलने मुलीवर आणि जावईवर गोळीबार केला. त्यात मुलगी तृप्ती जागेवर मयत झाली असून जावई अविनाश वाघ याच्या कमरेला व हाताला गोळी लागली असल्याचे कळतेय. अविनाश याला पुणे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. नेमकं हे प्रकरण काय हे आपण सविस्तर जाणून घेऊया.