Mumbai Bandra’s Link Square Mall Fire: मुंबईतील वांद्रे परिसरातील लिंक स्क्वेअर मॉलला भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पहाटे चार वाजता या मॉलमधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आग मॉलमध्ये पसरली. त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अशातच झिशान सिद्दिकी यांनी अग्निशमन दलावर काही आरोप केले आहेत.