पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेला सात दिवस उलटले असून यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता एकीकडे बोलून दाखवली जात असताना दुसरीकडे लष्कर, काश्मीर पोलीस, एनआयए यांची शोधपथकं हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी काश्मीर पिंजून काढत आहेत. हे दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याची बोललं जात असून तिथे ही पथकं शोध घेत आहेत. अशातच, हे दहशतवादी दीड वर्षापूर्वीच भारतात दाखल झाल्याचं समोर आलं आहे.