Sambhajiraje Chhatrapati: ‘ही लोकशाहीची थट्टा’; संभाजीराजे छत्रपतींची सध्याच्या राजकरणावर टिप्पणी
शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदेंसह पक्षाबाहेर पडला आणि भाजपासोबत सत्तेत विराजमान झाला. त्याच पाठोपाठ वर्षभराने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ३० आमदारही शिंदे, फडणवीसांसह सत्तेत सामील झाले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी “राज्यातल्या राजकारण्यांनी लोकशाहीची थट्टा लावली आहे. एकमेकाला विरोध करत होते ते एकत्र आले आहेत. हा सुसंस्कृत महाराष्ट्र असू शकत नाही. मात्र अशा राजकारण्यांना थोड्या दिवसात उत्तर मिळेल” अशी टीका केली आहे..