ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे तसेच डोंबिवली परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल असून त्यामध्ये चोरीचा गुन्ह्य़ाचाही समावेश आहे. याशिवाय लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करणे, बेकायदेशीर जमाव करणे,  बलाचा प्रयोग करणे, मानवी व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येणारी कृती करणे तसेच सार्वजनिक शांतता भंग करणे, अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांचा समावेश आहे. सरनाईक यांच्याकडे सात कोटी ३६ लाख २३ हजार ६४३ रुपयांची जंगम तर नऊ कोटी १४ लाख चार हजार रुपये स्थावर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्याकडे टोयोटो लॅन्ड क्रुझर ही कार आहे. अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याकडे पाच कोटी ८१ लाख ९१ हजार ५४९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर ११ कोटी ८८ लाख ८ हजार ९६३ रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे स्कोडा कार आहे.

Story img Loader