लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची पहिली मोठी चाचणी म्हणून पाहण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार आहे.
महाराष्ट्रातील मतमोजणी २६९ ठिकाणी २८८  केंद्रावर  मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. तीन वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. राज्यात भाजपने २८०, बसपाने २६०, काँग्रेस २८७, राष्ट्रवादी काँग्रेस २७८, शिवसेना २८२ आणि मनसेने २१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. तर एकूण ४११९ उमेदवार रिंगणात आहेत.
२८८ मतदारसंघांपैकी २३४ सर्वसाधारण, अनुसूचित जातींसाठी २९ तर अनुसूचित जमातींसाठी २५ मतदारसंघ राखीव आहेत.
पक्षीय बलाबल – २००९
काँग्रेस – ८२, राष्ट्रवादी काँग्रेस – ६२, भाजप – ४६, शिवसेना – ४४, अपक्ष – २४, मनसे – १२, शेकाप – ४, सपा – ४, बहुजन विकास आघाडी – २, जनसुराज्यशक्ती – २, माकप – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, भारिप बहुजन महासंघ – २, लोकसंग्राम – १, स्वाभिमानी – १.

Story img Loader