रविवारीच्या मतमोजणीसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून मतदान केंद्र आणि परिसरात २७ हजार पोलीस कर्मचारी आणि २ हजार ८०० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा कवच ठेवण्यात आले आहे. मुंबईत शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभा मतदान केंद्रावर स्वतंत्रपणे मतमोजणी होणार आहे. ३६ पैकी २५ मतदारसंघ संवेदशनशील ठरविण्यात आले असून त्यादृष्टीने सुरक्षेची व्युहरचना करण्यात आली आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आदी मिळून २ हजार ८०० पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
आणखी वाचा