हरयाणात सत्तारूढ काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय लोक दल (आयएनएलडी) या प्रमुख विरोधी पक्षामध्ये जाहिरातयुद्ध पेटले आहे. दोन्ही पक्षांनी  एकमेकांवर  आक्रमक जाहिरातींच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्यांसह विविध माध्यमांचा जाहिरातींसाठी सर्रास वापर करण्यात येत आहे. आयएनएलडीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांनी काँग्रेस पक्षावर जमीन वापरातील बदल घोटाळा, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ‘१० सालोंसे गोलीबाजो की गुलाबी गँग सरकार’ ही जाहिरातीमागील संकल्पना आहे.पक्षाच्या मेळाव्यातही ‘गुलाबी गँग’ हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे.