भाजपचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील उमेदवार राम कदम यांच्यासह तिघांवर आचारसंहिता भंग, परवागनगीशिवाय प्रचार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम कदम भाजपच्या तिकिटावरून घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. असल्फा येथील गणपती मंदिराच्या आवारात त्यांनी आपले कार्यालय उघडून प्रचार सुरू केल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला मिळाली होती. याबाबत त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नियमानुसार उमेदवारांना धार्मिक स्थळांच्या आवारात प्रचार करता येत नाही.
वादग्रस्त आमदार
पूर्वी मनसेमध्ये असलेले राम कदम नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. विधानसभेत पोलीस उपनिरीक्षक सचिन सुर्यवंशी यांना कदम यांनी मारहाण केली होती. त्याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. भगवान गौतम बुद्धांचे अस्थिकलश असल्याचा दावा करून त्यांनी हे अस्थिकलश आपल्या मतदारसंघात दर्शनासाठी ठेवले होते. हे थोतांड असल्याचे सांगून या प्रकाराला विरोध करणाऱ्या तरुणांचे अपहरण करून त्यांना कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयात कोंडून बेदम मारहाण केली होती. पालिका अधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा कदम यांच्यावर आरोप आहे.
राम कदम यांच्याविरोधात गुन्हा
भाजपचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील उमेदवार राम कदम यांच्यासह तिघांवर आचारसंहिता भंग, परवागनगीशिवाय प्रचार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
First published on: 08-10-2014 at 03:04 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Against crime case ram kadam