आघाडीच्या राजकारणामुळे खनिज समृद्ध झारखंड मागे गेला, अशी टीका झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा (प्रजातांत्रिक) बाबूलाल मरांडी यांनी केली. राज्य स्थापनेपासून भाजप-झारखंड मुक्ती मोर्चानंतर काँग्रेस-झामुमो यांच्यात आघाडय़ा झाल्या. मात्र यात विकासकामे ठप्प झाली. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात सर्वात जास्त भाजप सत्तेत राहीला. मात्र त्यांना काहीही करता आले नाही. सध्याचे सरकारही अपयशी ठरले आहे असा आरोप मरांडी यांनी केला.
‘आघाडय़ांमुळे झारखंड पिछाडीवर’
आघाडीच्या राजकारणामुळे खनिज समृद्ध झारखंड मागे गेला, अशी टीका झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा (प्रजातांत्रिक) बाबूलाल मरांडी यांनी केली.
First published on: 31-08-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alliance keeps jharkhand back