आता युती तुटली असली तरी निवडणूक निकालानंतर होणाऱ्या संभाव्य समीकरणांसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांना पदाचा राजीनामा न देण्याची सूचना केली आहे. ‘मातोश्री’च्या आदेशानुसार गीते यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या आठवडाभरापासून शिवसेना रालोआतून बाहेर पडणार, गीते राजीनामा देणार असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र केंद्रात भाजपशी दोन हात करण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या उद्धव यांनी नमते घेत रालोआतून बाहेर पडण्याचा इरादा बदलला.
युती तुटल्यानंतर प्रचारात शिवसेनेवर टीका करणार नसल्याचे भाजपने घोषित केले होते. उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. मोदींवर टीका करण्याचा उद्धव ठाकरे टाळत आहेत. गीते यांच्या राजीनाम्यामुळे मोदींशी चर्चेची दारे बंद होतील, अशी भीती उद्धव यांना आहे. विशेष म्हणजे प्रारंभापासून केंद्र सरकारमधून बाहेर न पडण्यावर उद्धव ठाम आहेत. दबाव टाकण्यासाठी त्यांनी गीते यांच्या राजीनामा देण्याचे वक्तव्य केले होते. पण भाजपकडून या वक्तव्याची साधी दखलही घेतली गेली नाही.
उद्योग भवनातील आपल्या कार्यालयात ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा प्रारंभ करताना गीते म्हणाले की, मी राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. रालोआ कोणत्याही परिस्थितीत दुभंगणार आहे. रालोआ सरकार स्थापनेसाठी महाराष्ट्राने ४२ खासदार दिले. त्यात शिवसेनेचा वाटा मोठा आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. भविष्यातील समीकरणांवर बोलणे योग्य नसल्याचे गीते म्हणाले. प्रतिनिधी, नवी दिल्ली
आता युती तुटली असली तरी निवडणूक निकालानंतर होणाऱ्या संभाव्य समीकरणांसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांना पदाचा राजीनामा न देण्याची सूचना केली आहे. ‘मातोश्री’च्या आदेशानुसार गीते यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या आठवडाभरापासून शिवसेना रालोआतून बाहेर पडणार, गीते राजीनामा देणार असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र केंद्रात भाजपशी दोन हात करण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या उद्धव यांनी नमते घेत रालोआतून बाहेर पडण्याचा इरादा बदलला.
युती तुटल्यानंतर प्रचारात शिवसेनेवर टीका करणार नसल्याचे भाजपने घोषित केले होते. उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. मोदींवर टीका करण्याचा उद्धव ठाकरे टाळत आहेत. गीते यांच्या राजीनाम्यामुळे मोदींशी चर्चेची दारे बंद होतील, अशी भीती उद्धव यांना आहे. विशेष म्हणजे प्रारंभापासून केंद्र सरकारमधून बाहेर न पडण्यावर उद्धव ठाम आहेत. दबाव टाकण्यासाठी त्यांनी गीते यांच्या राजीनामा देण्याचे वक्तव्य केले होते. पण भाजपकडून या वक्तव्याची साधी दखलही घेतली गेली नाही.
उद्योग भवनातील आपल्या कार्यालयात ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा प्रारंभ करताना गीते म्हणाले की, मी राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. रालोआ कोणत्याही परिस्थितीत दुभंगणार आहे. रालोआ सरकार स्थापनेसाठी महाराष्ट्राने ४२ खासदार दिले. त्यात शिवसेनेचा वाटा मोठा आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. भविष्यातील समीकरणांवर बोलणे योग्य नसल्याचे गीते म्हणाले.
राजीनामा देणार नाही; रालोआ भक्कम – गीते
आता युती तुटली असली तरी निवडणूक निकालानंतर होणाऱ्या संभाव्य समीकरणांसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांना पदाचा राजीनामा न देण्याची सूचना केली आहे.
First published on: 02-10-2014 at 02:27 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant geete rules out resignation says sena still part of nda