हरयाणात दहा वर्षांची काँग्रेसची राजवट संपण्याची चिन्हे आहे. अनेक मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप राज्यात सत्तेत येईल, असे भाकीत वर्तवले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा मिळून बहुमतासाठी पाच जागा कमी पडल्या होत्या. लोकदलाने ३१ जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला होता. भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. हरयाणा जनहीत काँग्रेसच्या पाच सदस्यांचा मदतीने भुपिंदरसिंह हुड्डांनी सरकार स्थापन केले होते.

Story img Loader