प्रतिष्ठेच्या ठाणे मतदारसंघात यंदा चुरशीची तिरंगी लढत होत आहे. गेल्या वेळी शिवसेनेच्या राजन विचारे यांच्यापुढे मनसेने मोठे आव्हान उभे केले होते. या वेळी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक हे शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्यांना भाजपकडून माजी आमदार संजय केळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी आव्हान दिले आहे.
नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव मतदारसंघात सहकारातील काळे-कोल्हे या घराण्यातील संघर्ष पुन्हा दिसणार आहे. सहकारातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता बिपीन कोल्हे या भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. त्यांचा सामना दिवंगत नेते शंकरराव काळे यांचे नातू
आशुतोष काळे यांच्याशी आहे. राज्यातील सर्वाधिक खर्चीक लढतींपैकी एक असे याचे
वर्णन केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा