काही आमदारांसह भाजपमध्ये सामील झालात तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असा प्रस्ताव भाजपने सरकार स्थापनेसाठी दिल्याचा दावा आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. भाजपने मात्र कुमार विश्वास यांचा दावा फेटाळून लावला आहे.
१९ ऑगस्टला गाझियाबाद येथील आपल्या निवासस्थानी बैठक झाली होती, त्यात भाजप खासदाराने आपल्यासमोर हा प्रस्ताव मांडला होता. तो भाजप खासदार कोण होता हे सांगण्यास कुमार विश्वास यांनी नकार दिला असून, आपचे नेते संजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज तिवारी यांनी हा प्रस्ताव कुमार विश्वास यांच्यापुढे मांडला आहे. आपच्या नेत्यांनी आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचला आहे असा दावा करीत तिवारी यांनी विश्वास यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव मांडल्याचा इन्कार केला. दिल्लीचे भाजपप्रमुख सतीश उपाध्याय यांनी सांगितले की, कुमार विश्वास यांनी तो प्रस्ताव मांडणाऱ्या भाजप खासदाराचे नाव सांगावे, असे बिनबुडाचे आरोप केजरीवाल यांनीही केले आहेत.
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव
काही आमदारांसह भाजपमध्ये सामील झालात तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असा प्रस्ताव भाजपने सरकार स्थापनेसाठी दिल्याचा दावा आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे.
First published on: 31-08-2014 at 03:58 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp threatens legal action against aaps kumar vishwas for poaching claim