देशातील इतर राज्यांआधीच आंध्र प्रदेशला डिजिटल राज्य बनविण्याचा मानस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे. देशाला ‘डिजिटल इंडिया’ बनविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षा असून त्यापूर्वीच आंध्र प्रदेशला डिजिटल राज्य बनविण्याची इच्छा असल्याचे नायडू म्हणाले. आपले स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचेही नायडू यांनी येथे स्पष्ट केले. सर्व विद्यार्थ्यांना आय-पॅड उपलब्ध करून देण्याचा व पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader