महाराष्ट्रात नव्याने दोनच दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या भाजप सरकारचे खातेवाटप जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले आहे. तर, अर्थ खाते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शालेय शिक्षण व उच्च, तंत्रशिक्षण दोन विभाग एकत्र करत मनुष्यबळ विकास असे नवे खाते निर्माण करून त्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. शिक्षक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार व पणन मंत्रालय देण्यात येणार आहे. तर, विष्णू सवरा यांना आदिवासी विकास तर पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडे ग्रामविकास खाते असणार आहे. मुंबईतील आमदार प्रकाश मेहता यांच्याकडे खाण व उद्योग मंत्रालय असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा