संघ परिवारातील कार्यकर्ता के. मनोज याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याबद्दल माकपचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यावर टीका केली आहे. के. मनोज याची अलीकडेच हत्या करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन नातेवाइकांची भेट घेणे अनुचित आहे, असे अच्युतानंदन यांनी म्हटले आहे.

Story img Loader