राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद आमदारकीचा बुधवारी राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.
बीडमध्ये परळी मतदार संघात भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात २५ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाल्याने तसेच बीड जिल्ह्यातील सहा जागांपैकी अवघी एक जागा राष्ट्रवादीला राखता आली. उर्वरित पाच जागा भाजपने जिंकल्या. या संपूर्ण पराभवामुळे खचलेल्या धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेत आपल्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा