राज्यातील धनगर समाजाची आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या आघाडी सरकारचे आता आम्हाला आरक्षणच नको. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करणे हाच आमचा आता यापुढील एक कलमी कार्यक्रम असेल, अशी घोषणा धनगर आरक्षण संघर्ष समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. १ सप्टेंबरला आघाडी सरकारच्या निषेधार्थ राज्यभर मोर्चे काढण्याचे जाहीर करीत निवडणुकीत धनगर समाजाला महायुतीच्या बाजूने उभे करण्याचे संकेत संघर्ष समितीने दिले.