हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असल्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांतून मिळत असले तरी आपला या चाचण्यांवर विश्वास नाही, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले. निवडणुकीनंतरच्या आघाडय़ांबाबत विचारता ते म्हणाले की, भारतीय राजकारणात आज तत्त्वनिष्ठ राजकारण पिछाडीला गेले आहे आणि नेत्यांचा वैयक्तिक करिष्मा अग्रस्थानी आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री- पंतप्रधान कोण होणार, याबाबत साठमाऱ्या सुरू असतात. राजकारणात तत्त्वनिष्ठेलाच महत्त्व असले पाहिजे व्यक्तिनिष्ठेला नव्हे, असेही त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा