लोकसभेच्या निवडणुकीतील दारुण पराभव आणि पक्षांतर्गत कुरबुरी यांनी ग्रासलेल्या द्रमुकला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी केला आहे. द्रमुक हा केवळ एक पक्ष नाही तर ही एक चळवळ असून ती संपुष्टात आणणारा अजून जन्माला यावयाचा आहे, असे करुणानिधी यांनी म्हटले आहे.द्रमुकचा कारभार एका कुटुंबासारखा आहे, तो केवळ पक्ष अथवा सामाजिक चळवळ नाही तर सामाजिक क्रांती आणण्याची ही चळवळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही चळवळ संपुष्टात आणणारा अजून जन्माला यावयाचा आहे, असे करुणानिधी म्हणाले.

Story img Loader