उत्तर प्रदेशातील नोइडा आणि अन्य एका ठिकाणी विधानसभेसाठी पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असतानाच भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक भाषणे करण्याच्या आरोपावरून आदित्यनाथ यांना आयोगाने फटकारले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदित्यनाथ पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. गेल्याच आठवडय़ात त्यांनी लखनऊ येथे प्रक्षोभक भाषण केले होते. तसेच नोइडा येथेही त्यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांची ध्वनिचित्रफीत निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाली असून त्याची दखल घेत आयोगाने राज्यातील निवडणूक आयोगाला आदित्यनाथ यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे आदेश दिले.

Story img Loader