लोकसभा निवडणुकीतील मोदींची हवा कमी झाली असल्याचे देशभरातील पोटनिवडणुकीच्या निकालाने दिसून आले आहे. हा निकाल काँग्रेससाठी अनुकूल ठरणारा असून विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  कोल्हापूर ही छत्रपती राजर्ष िशाहूंची भूमी आहे. येथूनच लढण्याची ऊर्जा मिळते असा उल्लेख करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाची चर्चा सुरू असून ती लवकरच संपेल. देशात सर्वाधिक वेगाने विकास करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी भाषणात केला.

Story img Loader