गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक यशवंत शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
 लोकसभा निवणुकीदरम्यान २१ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची लालबागच्या मेघवाडी येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ठाकरे यांनी परप्रांतियांना उद्देशून प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्याविरोधात व्यावसायिक शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. ठाकरे यांचे वक्तव्य दोन प्रांतांत तेढ निर्माण करणारे आहे, असे शिंदे यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर शुक्रवारी काळाचौकी पोलिसांनी राज ठाकरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Story img Loader